घरकाम करणाऱ्या एका विवाहितेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कुर्ला येथील नेहरूनगर परिसरात घडली. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही फरार आहेत.
कुर्ला येथील ठक्करबाप्पा कॉलनीत राहणाऱ्या या महिलेची ओळख रेश्मा शेख हिच्याशी झाली. ही पीडित विवाहित महिला घरकाम करत असल्याचे समजल्यानंतर रेश्माने तिला नेहरूनगरमधील आफ्ताब सुर्वे याच्या घरी कामाला लावले. आफ्ताबने घरात एकटाच असताना  तिच्याशी अश्लिल चाळे केले. तिने प्रतिकार केला असता चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.