मुंबईतील करोना रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढले असून रुग्ण दुपटीचा कालवधीही तीन महिन्यांवरून दोन महिन्यांवर आला आहे. मंगळवारी  १३४६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४२ मृत्यू झाले आहे. मृतांची संख्या पुन्हा एकदा ४० च्या पुढे गेली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर पुन्हा एकदा एक टक्कय़ापेक्षा पुढे गेला आहे. बोरिवली, कांदिवली, वांद्रे पश्चिम, दहिसर, मुलुंड, गोरेगाव परिसरात हाच दर १.३ टक्कय़ांच्या पलिकडे पोहोचलेला आहे. मंगळवारी १३४६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १ लाख ५८ हजार ७५६ वर गेला आहे. तर ८८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ लाख २५ हजार ९०६  म्हणजेच ७९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत २४,५५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

मंगळवारी ४२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची एकूण संख्या ७९३९ वर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील मृतांची संख्या ३० ते ३५ च्या आतच होती. ४२ मृतांपैकी २८ पुरुष व १४ महिला होत्या. २७ रुग्णांचे वय ६० वर्षांपुढे होते. मुंबईत ८ लाख ४३ हजार ६९१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील करोनास्थिती

* एकूण बाधितांची संख्या : १ लाख ५८ हजार ७५६

* करोनामुक्त : १ लाख २५हजार ९०६

* उपचाराधीन रुग्ण : २४,५५६

* मृतांची संख्या : ७९३९

* लक्षणे असलेले रुग्ण : ७००८

* लक्षणे नसलेले रुग्ण : १६,०२७

* गंभीर  रुग्ण : ११०९

* दिवसभरातील चाचण्या : ९३४७