राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दीर्घ काळ सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सांभाळणारे छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय सध्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहार आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात कचाट्यात सापडले आहेत. सक्तवसुली महासंचलनालयाने सोमवारी रात्री उशीरापर्यंत चाललेल्या चौकशीनंतर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक केली. समीर भुजबळांच्या अटकेनंतर आता छगन भुजबळांवर कोणती कारवाई केली जाणार? येत्या काळात त्यांनाही अटक होणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ‘आम्ही करून दाखवलं, समीर भुजबळ यांना अटक झाली, आता पंकज भुजबळांचा नंबर’ असे ट्विट करून सुतोवाच केले आहे.

 

दरम्यान, भुजबळ कुटुंबियांची धनसंपदा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले होते. २००९ च्या निवडणुकीत भुजबळ यांनी ७ कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते, तर त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत भुजबळांच्या धनसंपदेत तिपटीने वाढ होऊन ती जवळपास २२ कोटींच्या घरात पोहोचली असल्याचे समोर आले होते. पण याचवेळी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी गौप्यस्फोट करत भुजबळ कुटुंबियांनी तब्बल २६०० कोटींची माया जमविल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुरु झालेल्या धाडसत्रात सामान्य नागरिकाचे डोळे गरगरुन जातील, अशी भुजबळांची धनसंपदा समोर आली होती. भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेचा वैभव पाहता भुजबळांची धनसंपदा नेमकी आहे तरी किती? असा प्रश्न पडतो.

भुजबळांच्या मालमत्तेसंदर्भात माहिती देणाऱया काही महत्त्वाच्या लिंक्स-
* छगन सदन तेजोमय..
*
भुजबळ पिता-पुत्रांची मालमत्तेत स्पर्धा
* छगन भुजबळांची संपत्ती २६०० कोटी रुपये-सोमय्या
* दमानिया यांच्या पत्रातील माहितीप्रमाणे भुजबळ कुटुंबीयांची मालमत्ता
* ‘सदन’भुजबळ!

छगन भुजबळांच्या चौकशीसंदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्यांच्या लिंक्स
* ‘ईडी’कडून समीर भुजबळांना अटक
* भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांवर छापे
* भुजबळांच्या एमईटीला भूखंड परत करावा लागणार?
* भुजबळांच्या ‘एमईटी’ला न्यायालयाचा दिलासा नाहीच!
* एमईटीशेजारील जागेप्रकरणी छगन भुजबळांची माघार * छगन भुजबळ दोषीच!
* भुजबळांची वांद्रे, सांताक्रुझमधील मालमत्ता जप्त, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई
* माफीच्या साक्षीदारासाठी आता एसीबीचा प्रयत्न!
* सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो, भुजबळ ‘निर्दोष’?
*