मध्य रेल्वेवरील परळ स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी रविवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० या आठ तासांच्या काळात ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. परळ स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारमधील नवीन पुलावर बारा मीटर रुंदीच्या पुलासाठी नऊ गर्डर टाकण्याचे काम केले जाईल. त्यामुळे कल्याण ते ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर घेण्यात येणारा ब्लॉक रद्द करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल गाडय़ांची वाहतूक माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. तर अप मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाडय़ा माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ांना दादर स्थानकात थांबा देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. या गाडय़ा ठाणे स्थानकापर्यंतच धावतील.  तर रविवारी ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी, नेरुळ दरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते नायगाव दरम्यान ब्लॉक नियोजित वेळेत होईल.

पुढील गाडय़ा ठाणे स्थानकापर्यंतच धावतील

’ ११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस

’ २२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

’ १२१२६ पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस

’ १२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन

’ १२११०मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस

’ १२३२१ हावडा-मुंबई मेल व्हाया चौकी

’ ११०२४ कोल्हापूर-मुंबई स’ाद्री एक्स्प्रेस

’ १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

’ १७०३२ हैद्राबाद-मुंबई एक्स्प्रेस

’ ११०४२ चैन्नई-मुंबई एक्स्प्रेस

’  ११०९४ वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस