मुंबई : पीओपी वापराबाबत केंद्रीय पर्यावरण खात्याने अभ्यासगट नियुक्त केल्याने त्यांचा अहवाल येईपर्यंत पीओपी वापरावरील बंदीस केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी राहणार नाही.
भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी जावडेकर यांनी दिल्लीत मंगळवारी पुन्हा भेट घेतली. पीओपीवरील बंदीचा फटका राज्यातील पाच लाख गणेश मूर्तीकार व कारागिरांना बसला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अभ्यास समिती नेमली आहे. माघी गणेशोत्सव जवळ आला आहे. करोना टाळेबंदीमुळे मूर्तीकार व कारागिरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी बंदीवरील स्थगिती उठवावी, अशी मागणी शेलार यांनी जावडेकर यांच्याकडे केली. जावडेकर यांनी त्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना निर्देश दिल्याची माहिती शेलार यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 2:05 am