मुंबई : देशात व महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक झाल्याने मागील वर्षीपासून अतिरिक्त साखरेचे संकट निर्माण झाले असून त्यात या वर्षी भर पडणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेच्या संकटावर इथेनॉलनिर्मिती हाच खात्रीशीर उपाय असून साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून साखर उत्पादनाचे प्रमाण कमी करून इथेनॉलनिर्मितीवर भर द्यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी साखर उद्योगविषयक दूरचित्रसंवादात के ले.

पुढील साखर हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने साखर उद्योगासमोरील आव्हानांचा आढावा व त्यावरील संभाव्य उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी दूरचित्रसंवाद पार पडला. मागील हंगामात देशात देशात २७२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत बाजारपेठेतही साखरेच्या विक्रीवर करोनामुळे परिणाम झाला आहे. त्यामुळे २०२०-२१ चा हंगाम सुरू होत असताना भारतात साखरेचा १२२ लाख मेट्रिक टनांचा साठा शिल्लक असेल. शिवाय ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू होणाऱ्या पुढील साखर हंगामात देशभरात ३११ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. देशातील साखरेचा सरासरी खप वार्षिक २६० लाख टन आहे. ५० लाख टन साखर निर्यात होऊ शके ल आणि १२३ लाख टन साखर शिल्लक राहील, अशी आकडेवारी नाईकनवरे यांनी मांडली.

साखरेचे पोते तयार झाल्यापासून ते विकले जाऊन पैसे मिळेपर्यंत साखर कारखान्यांना सहा ते सात महिने वाट पाहावी लागते. या उलट खनिज तेलात इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे राष्ट्रीय तेलकं पन्या इथेनॉल खरेदीस उत्सुक आहेत. शिवाय इथेनॉल तयार होऊन त्याची विक्री झाल्यानंतर पैसे मिळण्याचा अवधी अवघे २१ दिवस आहे. शिवाय केंद्र सरकारने इथेनॉलसाठी ५० ते ६० रुपयांचा दर निश्चित के लेला असल्याने दराबाबत निश्चिंत राहता येते. त्यामुळे इथेनॉल हे बाजारपेठे, दर व त्यातून मिळणारा नफा या सर्व गोष्टींमध्ये खात्रीशीर उत्पन्न देणारे उत्पादन आहे. त्यामुळे उसाच्या रसापासून साखर तयार करून अतिरिक्त साखरेच्या साठय़ात भर घालण्यापेक्षा साखर उत्पादन कमी करून इथेनॉलनिर्मितीवर भर दिला तरच साखर उद्योगाला अतिरिक्त साखरेच्या संकटातून मार्ग काढता येईल, असे प्रकाश नाईकनवरे यांनी स्पष्ट के ले.

ऑगस्टपासूनच ३३ रुपये दराची मागणी

देशातील साखर उद्योगाची परिस्थिती लक्षात घेऊन के ंद्र सरकारने साखरेचा किमान दर ३१ रुपयांवरून ३३ रुपये करावा आणि ती वाढ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामावेळी करण्याऐवजी आता तातडीने ऑगस्टमध्येच करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी के ंद्र सरकारकडे के ल्याची माहितीही प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.