मध्य रेल्वेच्या हार्बर तसेच ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा देत बुधवारी ३१ जानेवारीपासून या मार्गावर २६ नवीन लोकल फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. यापैकी १६ फेऱ्या ट्रान्सहार्बरवर तर १० हार्बरवरील आहेत. तसेच या फेऱ्या सामावून घेण्यासाठी सध्याच्या आठ लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.
या फेऱ्यांमुळे हार्बरवरील फेऱ्यांची एकूण ६०४ वरून ६१४ तर ट्रान्स हार्बरवरील फेऱ्यांची संख्या २४६ वरून २६२ वर पोहोचेल. तर मध्य रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्याही १,७०६ वरून थेट १,७३२ वर पोहोचत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 3:39 am