07 April 2020

News Flash

शिक्षणमंत्री तावडेंच्या नावाने पसरवलं जाणारं ‘ते’ ट्विट चुकीचं, परीक्षा होणारच

वेळापत्रकात कोणताही बदल नाही - विद्यापीठ प्रशासन

शुक्रवारी संध्याकाळनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नावाचं ट्विट पसरवुन, विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा पेपर रद्द झाल्याची बातमी पसरली होती. यानंतर मुंबई विद्यापीठाकडून तावडे यांचं अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र यानंतर तावडे यांनी स्वतः ट्विट करत आपलं अकाऊंट हॅक झालं नसून, आपल्या नावाने चुकीची माहिती देणारा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर पसरवला जात असल्याचं म्हटलं.

सध्या राज्यात परीक्षांचं सत्र सुरु आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी विद्यापीठाच्या वाणिज्या शाखेचा पेपर तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचं विनोद तावडेंचं ट्विट सोशल मीडियावर पसरू लागला. विद्यापीठ प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ दखल घेत तावडेंचं अकाऊंट हॅक करण्यात आलं असून परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं म्हटलं.

यानंतर विनोद तावडे यांनीही, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नसावा यासाठी चुकीची माहिती देणाऱ्या ट्विटचा स्क्रिनशॉट टाकत, परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं सांगितलं.

घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यापीठ प्रशासन तक्रार दाखल करणार आहे की नाही हे मात्र कळू शकलेलं नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 11:04 pm

Web Title: fake tweet circulated on social media by naming education minister vinod tawde about exam schedule later he clarify no change in schedule
टॅग Vinod Tawde
Next Stories
1 धक्कादायक! त्रास होत असल्याने मांजरीच्या पिल्लांना आगीत फेकलं
2 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बाजीराव वाघाचा मृत्यू
3 मुंबईत धावत्या बेस्ट बसला आग, थरार कॅमेऱ्यात कैद
Just Now!
X