News Flash

सहा दिवस मृत्यूशी दिली झुंज, वडिलांनी जिवंत जाळलेल्या ‘त्या’ मुलीचा अखेर मृत्यू

७५ टक्के भाजली होती

(सांकेतिक छायाचित्र)

वसई-विरारमध्ये जिंवत जाळण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जवळपास सहा दिवस पीडितेने मृत्यूशी झुंज दिली. पण अखेर शनिवापी तिची प्राणज्योत मालवली. प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन विरारमध्ये आपल्या १६ वर्षाच्या मुलीला बापानेच जिवंत जाळल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी घडली होती.

मुलीचे प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून हे कृत्य वडिलांनी केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विरार पूर्व गोपचर पाडा येथे राहणाऱ्या मोहम्मद मूर्तिजा मंसूरी याला आपली मुलगी सतत फोनवर बोलत राहते. तसेच तिचे कुणासोबत तरी प्रेमसंबंध आहे, असा संशय होता.

शाहीस्ता मूर्तिजा मन्सुरी (१६) असे या मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. मूर्तिजा मन्सुरी असे आरोपीचे नाव आहे. आधी विरारच्या रुग्णालयात व त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात तिला उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. ७५ टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर होती. अखेर या मुलीचा शनिवारी मृत्यू झाला, अशी माहिती विरार पोलिसांनी दिली. मुलीला पेटवून देणारा बाप पोलिसांच्या अटकेत असून, आता या गुन्ह्यात ३०२ हे कलम लावले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 9:02 am

Web Title: father burned to her doughter in vasai
Next Stories
1 अदानीच्या वीजग्राहकांवर पुन्हा दरवाढीचे संकट
2 पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या दिवशीच उद्धव यांचा दुष्काळ दौरा
3 आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
Just Now!
X