25 February 2021

News Flash

मनसेच्या चिन्हात आता फक्त इंजिन!..कोणता झेंडा घेणार राज हाती?

राज ठाकरे यांच्या 23 जानेवारीच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 23 जानेवारी रोजी काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र ते त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलणार हे नक्की झालंय कारण त्यांच्या पक्ष चिन्हातून झेंडा काढण्यात आला आहे आणि फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आलं आहे. MNS Adhikrut या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसतं आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित मानलं जातं आहे. मात्र त्याचसोबत राज ठाकरे कोणता झेंडा हाती घेणार? हा प्रश्नही उपस्थित होतो आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये दोनदा दोन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये काय बोलणं झालं ही माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र भाजपा आणि मनसे यांची युती होऊ शकते अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं. मनसेने कार्यपद्धतीत काही बदल केले तर युती शक्य आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र राज ठाकरे यांच्याकडून यासंदर्भात काहीही वक्तव्य समोर आलेलं नाही. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राजकारणात कुणीही कुणाचा फार काळासाठी शत्रू नसतो असं सूचक वक्तव्य केलं होतं. आता मनसेने ट्विटर अकाऊंटवरुन झेंडाही हटवला आहे. त्यामुळे भगवा झेंडा हाती घेऊन राज ठाकरे हिंदुत्त्वाच्या वाटेवर जाणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

बॅनरही ठरले होते चर्चेचा विषय

विचार महाराष्ट्र धर्माचा निर्धार हिंदवी स्वराज्याचा असं मनसेचं पोस्टर 17 जानेवारी रोजी झळकलं होतं. तसंच 17 जानेवारीच्या सकाळी शिवसेना भवनाच्या समोर राज ठाकरे महाराष्ट्र धर्म सम्राट या आशयाचं पोस्टरही लावण्यात आलं होतं.  या दोन पोस्टर्सची चर्चा पुढचे दोन दिवस चांगलीच रंगली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे अशी चर्चा रंगली आहे. हा अवकाश भरुन काढण्यासाठी राज ठाकरे पुढाकार घेतील अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात ते काय भूमिका घेणार हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसे अधिवेशानसंदर्भातलं एक ट्विट MNS Adhikrut वर पोस्ट करण्यात आलं आहे. मनसे अधिवेशनाचा नेत्रदीपक सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता पार पडणार आहे. असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 8:10 pm

Web Title: flag removed from mns adhikrut twitter account only railway engine is there scj 81
Next Stories
1 फडणवीस सरकारच्या काळात टँकर घोटाळा: रोहित पवार
2 ‘पाथरी हे साईंचं जन्मस्थळ’ हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांकडून मागे, शिर्डीकरांची नाराजी अखेर दूर
3 …और काँग्रेसने शिवसेना के उद्धव ठाकरे को दुल्हा बना दिया; ओवेसींची कोपरखळी
Just Now!
X