News Flash

विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे उद्या (दि.१५) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनीच्या आजारावर त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. दरम्यान, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे उद्या (दि.१५) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. देशमुख यांच्या निधनानंतर चांगले मार्गदर्शक आणि नेतृत्व हरपल्याच्या भावना विविध राजकीय पक्षांनी व्यक्त केल्या आहेत.

१ सप्टेंबर १९३५ रोजी शिवाजीराव देशमुख  यांचा सांगलीत जन्म झाला होता. काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते तसेच पक्षात त्यांनी महत्वाची पदेही भुषवली होती. एक संयमी नेता आणि चांगला मार्गदर्शक अशी त्यांची ख्याती होती. ते १९९६ आणि २००२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. तत्पूर्वी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख हे त्यांचे पुत्र होत. दरम्यान, २००९ पासून ते शिराला तालुक्यातील कोकरुड येथे राहत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 7:32 pm

Web Title: former speaker of vidhan parishad shivajirao deshmukh passes away
Next Stories
1 ‘भगवानबाबांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याला अटक करा’
2 मालिकांमध्ये गुंतवणुकीचे आमिष; सिनेदिग्दर्शकाला दोन कोटींचा गंडा
3 आईच्या चिते जवळच मुलाची पेटवून घेऊन आत्महत्या
Just Now!
X