10 August 2020

News Flash

सफाळे येथे मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक ठप्प

सांयकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

नागपूर-भंडारा रस्त्यावर डांबर घेऊन जात असलेला टिप्पर (एमएच ३१ सीबी ४१९) रस्त्याच्या मधोमध उभा होता.

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे मालगाडीचे दोन डबे घसरल्याने मुंबईकडे येणारी व गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सांयकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. ही मालगाडी मुंबईकडे येत होती. या अपघातामुळे या मार्गावरील सर्व गाड्या जागीच थांबल्या आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही समावेश आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळित होण्यास तीन ते चार तास लागतील अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीचे दोन डबे सफाळे येथे घसरले. डबे बाजूला घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी क्रेनही मागवल्याचे समजते. सांयकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक रखडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2017 7:38 pm

Web Title: goods train derail near safale mumbai gujrat train route badly affected
Next Stories
1 मुंबईत अटक केलेल्या ‘त्या’ महिला दाऊद टोळीच्या ‘खबरी’ निघाल्या!
2 जागतिक महिला दिन : ही दहा वाक्ये तुमच्यातील वेगळेपण कायम जपतील..
3 म्हाडाचा एफएसआय न देणाऱ्या विकासक, अधिकाऱ्यांची एसआयटीकडून चौकशी
Just Now!
X