News Flash

हार्बर रेल्वे विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील हार्बर मार्गाच्या दोन मार्गिका माहीम स्थानकाजवळून सुरू होतात.

माहीमजवळ तांत्रिक बिघाड; १६ सेवा रद्द

अंधेरीपर्यंत जाणाऱ्या हार्बर मार्गावर माहीम स्थानकाजवळील क्रॉसिंग पॉइंटजवळ एका इंजिनाचा पेंटोग्राफ मंगळवारी ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यामुळे हार्बर मार्गावरून अंधेरी आणि वांद्रे येथे जाणाऱ्या गाडय़ांची वाहतूक पूर्णपणे बंद पडली. या बिघाडामुळे तब्बल १६ सेवा रद्द करण्यात आल्या, तर हार्बर मार्गाची वाहतूक पाऊण तास उशिराने सुरू होती. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी सव्वा तास लागला.

पश्चिम रेल्वेवरील हार्बर मार्गाच्या दोन मार्गिका माहीम स्थानकाजवळून सुरू होतात. येथे रूळ एकमेकांना छेदून जातात. मंगळवारी सकाळी ११.०५च्या सुमारास येथून जाणाऱ्या एका इंजिनचा पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. त्यामुळे हे इंजिन हार्बर मार्गाच्या दोन मार्गिकांच्या मध्येच थांबले. त्यामुळे अंधेरीकडे जाणारी वाहतूक बंद पडली. त्यानंतर ३५ मिनिटांनी या मार्गावरून सीएसटीकडे वाहतूक सुरू करण्यात यश आले. मात्र अंधेरीकडे जाणाऱ्या मार्गावर इंजिन अडकून पडले होते. तब्बल एक तासानंतर, दुपारी १२.१० वाजता ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेला पेंटोग्राफ सोडवण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 3:39 am

Web Title: harbour railway disturb at mahim
टॅग : Harbour Railway
Next Stories
1 लोकलला लटकणाऱ्याचा मृत्यू
2 उद्योगांना वीजसवलतीमुळे एक हजार कोटी रुपयांहून अधिक बोजा
3 बेस्ट तुमची, ब्रीदवाक्यही तुमचे!
Just Now!
X