News Flash

आंबेडकर स्मारकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला येत्या ६ डिसेंबरपूर्वी सुरुवात करावी, अन्यथा ६ डिसेंबर रोजी इंदू मिलमध्ये घुसून

| December 3, 2013 12:51 pm

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला येत्या ६ डिसेंबरपूर्वी सुरुवात करावी, अन्यथा ६ डिसेंबर रोजी इंदू मिलमध्ये घुसून स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात येईल, असा इशारा रिपब्किन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दिला आहे.
येत्या ६ डिसेंबर रोजी आंबेडकरी जनतेचा उद्रेक होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्व जबाबदारी शासनावर असेल, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
इंदू मिलची जमीन स्मारकासाठी हस्तांतरित करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला लोकसभेत मंजुरी मिळणे गरजेचे आहे.
संसदेच्या ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात या निर्णयाला संसदेची मंजुरी मिळावी आणि त्याच दिवशी सायंकाळी इंदू मिलमध्ये स्मारकाचे भूमिपूजन केले जावे, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 12:51 pm

Web Title: if work not start for ambedkar memorial then rpi protest
टॅग : Ramdas Athavale
Next Stories
1 कर्जबाजारी युवकाची अंधेरीत आत्महत्या
2 स्टेट बँक अधिकाऱ्याच्या घरावर छापे
3 ‘लकी कंपाऊंड’ प्रकरणातील आरोपी रुग्णालयात
Just Now!
X