16 January 2021

News Flash

मुंबईत पेट्रोलच्या दराने ओलांडला ९१ रुपयांचा टप्पा

डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर

संग्रहीत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. पाच दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज(१३ जानेवारी) तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ केली. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ९१.०७ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर, डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर पोहचले असून ८१.३४ रुपये प्रतिलिटर दर आहे. या अगोदर ४ ऑक्टोबर २०१८ रोजी, मुंबईत पेट्रोलचा दर ९१.३४ रुपये प्रतिलिटर होता.

राज्यातील परभणी येथे पेट्रोलचा दर सर्वाधिक ९३.४५ रुपये प्रतिलिटर व डिझेल ८२.४० रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहचला आहे. या अगोदर ६ व ७ जानेवारी रोजी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली होती. दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहारांमध्ये देखील पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ सुरूच आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज सकाळी सहा वाजता बदल होत असतो. सकाळी ६ वाजेपासून नवे दर लागू होतात. पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि अन्य बाबी जोडल्यानंतर त्याचा दर जवळपास दुप्पट होतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतीनुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 1:53 pm

Web Title: in mumbai the price of petrol has crossed rs 91 msr 87
Next Stories
1 आधी मिठी मारली नंतर… भरधाव लोकलमधून पत्नीला ढकललं; हार्बर लाईनवरील धक्कादायक घटना
2 मुच्छड पानवाल्यामुळे नवाब मलिक यांचा जावई अडचणीत; एनसीबीने बजावलं समन्स
3 महापालिकेकडून गंभीर आरोप होत असतानाच सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट
Just Now!
X