अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संध्याकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी श्रीदेवी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. विलेपार्लेतल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आहेत. यावेळी बॉलिवूड कलाकारांसह चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शोकाकुल वातावरणात बॉलिवूडच्या ‘चांदनी’ला अखेरचा निरोप देण्यात आला.

जवळपास ७३ तासांनंतर मंगळवारी रात्री अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईतील ग्रीन एकर्स या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. रात्री ९.३० च्या सुमारास दुबईतून चार्टर्ड विमानाने हे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले होते. श्रीदेवी यांचे अखेरचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी केली होती. अभिनेता सलमान खान, अर्जुन कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, सुष्मिता सेन, राजपाल यादवसह चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार ग्रीन एकर्सकडे वळले होते.

* बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी अनंतात विलीन; चाहते, कलाविश्व आणि कुटुंबीयांनी साश्रू नयनांनी दिला निरोप.

*श्रीदेवी यांचे पार्थिव विलेपार्ले सेवा समाज स्मशानभूमीत पोहोचले.

*विलेपार्ले सेवा समाज स्मशानभूमीबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी

*श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी शहारुख खान स्मशानभूमीत पोहोचला

* आपल्या आवडत्या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी लोटली.

*विलेपार्ले स्मशानभूमीच्या दिशेने श्रीदेवी यांचे पार्थिव मार्गस्थ.

*श्रीदेवी यांचे अखेरचे रुप पाहून वातावरण भावूक

*शासकीय इतमामात ‘चांदनी’ला अखेरचा निरोप.

*श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, पांढऱ्या फुलांच्या कवेत विसावलं श्रीदेवी यांचं पार्थिव

*थोड्याच वेळात श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार.

*श्रीदेवी यांचा सावत्र मुलगा अर्जुन कपूरही अंत्यदर्शनासाठी पोहोचला असून, तो सर्व गोष्टींकडे जातीने लक्ष देताना दिसला.

* अभिनेता विवेक ओबेरॉय, राजकुमार राव आणि डिंपल कपाडिया यांनीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली.

*मुंबई पोलिस बँड, लोखंडवाला येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल.

*जावेद अख्तर, शबाना आझमी, रवीना टंडन आणि मलायका अरोरा हे कलाकार मंडळीसुद्धा श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले.

*अंत्यदर्शनासाठी उरले अवघे काही क्षण; शासकीय इतमामात श्रीदेवी यांच्यावर होणार अंत्यसंस्कार .

*कलाकारांच्या गर्दीत ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.

*ग्रीन एकर्स सोसायटीमध्ये होळीनिमित्त आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द.

*सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.

*पती अजय देवगणसह अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ‘मिस हवाहवाई’ला निरोप देण्यासाठी दाखल.

 

*श्रीदेवी यांना आपल्या मुलीप्रमाणे मानणाऱ्या ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका सरोज खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चनही श्रीदेवी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल.

*सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गायिका अलका यागनिक, अभिनेत्री माधुरी दीक्षितही हजर.

*अभिनेत्री तब्बू आणि सुलभा आर्याही श्रद्धांजली वाहण्यासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल.

*अभिनेत्री सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडच्या ‘चांदनी’ला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचल्या.

*हेमा मालिनी, इशा देओल, हर्षवर्धन कपूर आणि रिया कपूरही श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.

*श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा.

*अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहूजासुद्धा श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.

manish, rajat
मनिष पॉल, रजत रवैल

*श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आदित्य ठाकरे सेलिब्रेशन स्पोर्स्ट्स क्लबमध्ये दाखल.

*अरबाज खान, फराह खान, उर्वशी रौतेलासुद्धा श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल.

*अनिल कपूर, संजय कपूर आणि इतर सर्व कुटुंबिय स्पोर्ट्स क्लबमध्ये हजर.

*श्रीदेवी यांचे पार्थिव सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल

*कपूर कुटुंबातील काही सदस्य सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबच्या दिशेने रवाना.

*स्पोर्ट्स क्लबमध्ये होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेत सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

*लोखंडवाला येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.