राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये मुंबईतील भाजपा आमदारांपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या तीन आमदारांच्या यादीत भाजपाच्या एकाही आमदाराच्या नावाचा समावेश नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार असल्याचे प्रजाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल असून तिसऱ्या स्थानी मालाडचे आमदार अस्लम रमझान अली शेख यांचा समावेश प्रजाने आपल्या अहवालात केला आहे. जाणून घेऊयात कोणत्या आमदाराची कामगिरी कशी आहे…

आमदाराचे नाव पक्ष गुण मतदारसंघ

lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
sanjay raut prakash ambedkar (4)
“वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”
five different political parties application to mumbai municipal corporation for shivaji park ground
‘शिवाजी पार्क’वर सभांचा धुरळा; मैदानासाठी पाच पक्षांचे महापालिकेकडे अर्ज
supriya sule rohit pawar
शरद पवार गटातीन दोन नेत्यांसाठी सुप्रिया सुळेंचं पोलिसांना पत्र; पत्रात रोहित पवारांचाही उल्लेख, नेमकी काय आहे मागणी?

अबु आझमी (सपा) ५७.१९ टक्के गुण (मतदारसंघ – मानखुर्द शिवाजीनगर)

अजय चौधरी (शिवसेना) ७०.७३ टक्के गुण (मतदारसंघ – शिवडी )

अमित साटम (भाजपा) ७०.३७ टक्के गुण (मतदारसंघ – अंधेरी (पश्चिम) )

अमीन अमीर अली पटेल (काँग्रेस) ७९.२९ टक्के गुण (मतदारसंघ – मुंबादेवी)

आशिष शेलार (भाजपा) ६७.०८ टक्के गुण (मतदारसंघ – वांद्रे (पश्चिम) )

अशोक पाटील (शिवसेना) ४०.०८ टक्के गुण (मतदारसंघ – भांडूप (पश्चिम) )

अस्लम शेख (काँग्रेस) ७९.३८ टक्के गुण (मतदारसंघ – मालाड (पश्चिम) )

अतुल भातखळकर (भाजपा) ७४.४२ टक्के गुण (मतदारसंघ – कांदिवली (पूर्व) )

भारती लवेकर (भाजपा) ६१.२३ टक्के गुण (मतदारसंघ – वर्सोवा)

कालीदास कोळंबकर (काँग्रेस) ६७.२६ टक्के गुण (मतदारसंघ – वडाळा)

मंगल प्रभात लोढा (भाजपा) ६४.२४ टक्के गुण (मतदारसंघ – मलबार हील)

मंगेश कुडाळकर (शिवसेना) ७०.१९ टक्के गुण (मतदारसंघ – कुर्ला)

मनिषा चौधरी (भाजपा) ७५.६२ टक्के गुण (मतदारसंघ – दहिसर)

आरिफ खान (काँग्रेस) ७४.१८ टक्के गुण (मतदारसंघ – चांदीवली)

पराग अलवानी (भाजपा) ७२.०४ टक्के गुण (मतदारसंघ – विलेपार्ले)

प्रकाश सुर्वे (शिवसेना) ५२.०६ टक्के गुण (मतदारसंघ – मागोठणे)

प्रकाश फाटेरफेकर (शिवसेना) ६४.५५ टक्के गुण (मतदारसंघ – चेंबूर)

राज पुरोहित (भाजपा) ५८.८६ टक्के गुण (मतदारसंघ – कुलाबा)

रामचंद्र कमद (भाजपा) ४१.६९ टक्के गुण (मतदारसंघ – घाटकोपर (पश्चिम))

रमेश लटके (शिवसेना) ४७. ४६ टक्के गुण (मतदारसंघ – अंधेरी (पूर्व) )

सदानंद सरवणकर (शिवसेना) ४५.६५ टक्के गुण (मतदारसंघ – माहीम)

संजय पोतनीस (शिवसेना) ५०.७६ टक्के गुण (मतदारसंघ – कलिना)

सदार तारा सिंग (भाजपा) ६७.१२ टक्के गुण (मतदारसंघ – मुलुंड)

सेल्वा तमील (भाजपा) ५३.८१ टक्के गुण (मतदारसंघ – सायन कोळीवाडा)

सुनील शिंदे (शिवसेना) ७९.३८ टक्के गुण (मतदारसंघ – वरळी)

सुनील राऊत (शिवसेना) ५९.५७ टक्के गुण (मतदारसंघ – विक्रोळी)

सुनील प्रभू (शिवसेना) ७७.७५ टक्के गुण (मतदारसंघ – दिंडोशी)

तृप्ती सावंत (शिवसेना) ६५.३० टक्के गुण (मतदारसंघ – वांद्रे (पूर्व))

तुकाराम काटे (शिवसेना) ५१.३९ टक्के गुण (मतदारसंघ – अणुशक्तीनगर)

वर्षा गायकवाड (काँग्रेस) ७३.७० टक्के गुण (मतदारसंघ – धारावी)

वारिस पठाण (एमआयएम) ५२.०५ टक्के गुण (मतदारसंघ – भायखळा)

योगेश सागर (भाजपा) ७३.०२ टक्के गुण (मतदारसंघ – चारकोप)