विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी, ४ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे दरम्यान घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र, हार्बर आणि पश्चिम मेगाब्लॉत कायम असणार आहे. मध्य रेल्वेनं ट्विट करत ही माहिती दिली आहे.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्ग, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्ग

कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्ग

कधी – अप मार्ग- स. ११.१० ते दु. ३.४० आणि डाऊन मार्ग- स. ११.४० ते दु. ४.१० वा.

परिणाम – सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगावदरम्यानच्या उपनगरी रेल्वे ब्लॉकवेळी रद्द राहतील. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष उपनगरी रेल्वे फेऱ्या सोडण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे – सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान अप व डाऊन धिमा मार्ग

कधी – स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.

परिणाम – अप व डाऊन धिम्या मार्गावरील उपनगरी रेल्वे सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. राम मंदिर स्थानकात मात्र उपनगरी रेल्वे थांबणार नाहीत.