कंगना रणौतला आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे ही त्यांचीही भावना आहे. आमचीही हीच भावना आहे. मुंबई ही आरपीआयची आहे, भाजपाची, राष्ट्रवादी काँग्रेसची, काँग्रेसची, शिवसेनेची सगळ्यांची आहे. मुंबईत राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कंगना रणौतवर अन्याय झाला आहे. तिला न्याय मिळवून देणार असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं आहे. कंगनासोबत मी एक तास चर्चा केली. त्यांनी काय काय घडलं ते सगळं सांगितलं. कंगना कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे आम्ही कंगनाच्या पाठिशी आम्ही आहोत असंही रामदास आठवले यांनी सांगितलं. कंगना रणौतच्या कार्यालयावर सूड भावनेने कारवाई करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

कंगनासोबत मी एक तास चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर अन्याय झाला आहे. माझं ऑफिस पाडण्यात आलं. ऑफिसमधल्या फर्निचरही तोडफोड केली आहे. याप्रकरणी मी कोर्टात जाणार आहे. मला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं तिने मला सांगितलं आहे. एक चांगलं ऑफिस मी केलं होतं ते तोडण्यात आलं. केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी आज अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कंगना कोणतीही जाती व्यवस्था मानत नसल्याचंही तिने मला सांगितलं. एवढंच नाही तर कंगना रणौतच्या कार्यालयावर जी कारवाई झाली ती सूड भावनेने करण्यात आली. सिनेमातून मिळणाऱ्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करुन तिने ऑफिस बांधलं होतं. त्यातला काही भाग अनधिकृत होता तर मग त्यासाठी आधी नोटीस का बजावण्यात आली नाही? असाही प्रश्न रामदास आठवलेंनी उपस्थित केला.

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. कंगनाने त्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो योग्यच आहे. या प्रकरणी कोर्ट योग्य तो निर्णय देईलच. कंगनाला मुंबईत घाबरण्याची काहीही गरज नाही. मुंबई सगळ्यांची आहे. आपण मुंबईकरच असल्याचंही कंगनाने मला सांगितलं आहे. आमचा कंगनाला पूर्णपणे पाठिंबा आहे असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं होतं.