25 May 2020

News Flash

नरेंद्र मोदींसंदर्भात कन्हैय्या कुमारनी दिलं चावणाऱ्या कुत्र्याचं उदाहरण

कन्हैय्या कुमार यांनी ही प्रसिद्धी मिळण्यासाठी किती गमवायला लागलंय याचा दाखला दिला

कुत्रा आपल्याला चावला तरी आपण कुत्र्याला चावत नाही असं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कन्हैय्या कुमार यांनी दिलं आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये कन्हैय्या कुमार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना असं विचारण्यात आलं की, “तुम्हाला लोकप्रिय करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग असल्यामुळे त्यांना तुम्ही धन्यवाद द्याल का?”. या खोचक प्रश्नाला तितकंच तिरकस उत्तर देताना कन्हैय्या कुमार यांनी ही प्रसिद्धी मिळण्यासाठी किती गमवायला लागलंय याचा दाखला दिला. अनेक धमक्या येतात, जाहीर सभांमध्ये हल्ले होतात, आवाज बंद करण्याचे प्रकार होतात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो असे अनेक दाखले देत ही प्रसिद्धी खडतर असल्याचे सांगितले.

हा सगळा त्रास नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच या प्रश्नातल्या नरेंद्र मोदींमुळे कन्हैय्या प्रसिद्ध झाले या संदर्भात बोलताना कन्हैय्या म्हणाले की कुत्रा माणसाला चावला तरी माणूस तर कुत्र्याला चावत नाही ना? त्यामुळे मी मोदींचे आभारच मानतो, त्यांना धन्यवाद देतो… ते यासाठी की त्यांच्यामुळे विरोधी शक्ती एकत्र आल्या आहेत. भाजपाविरोधात सगळ्या सेक्युलर संघटना एकत्र येणं हे घडून आलं त्यासाठी मोदींना धन्यवाद द्यायला हवेत अशी मार्मिक प्रतिक्रियाही कुमार यांनी व्यक्त केली.

नरेंद्र मोदीसरकारवर कठोर टीका करताना आधीच्या सरकारांमध्येही विरोधकांवर व्हिजिलन्स ठेवायची पद्धत होती परंतु आता ती जास्त प्रमाणात वाढल्याची टीका त्यांनी केली. देशाच्या संविधानाच्या रक्षणाची गरज प्रतिपादन करताना संविधानाच्या जागी अनेकजण मनुस्मृती आणण्याची भाषा करत असल्याचंही ते म्हणाले. आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून संधी मिळाली तर निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहू असं सांगताना कन्हैय्या कुमार यांनी हिंदी भाषिक राज्यांमधून निवडणूक लढवण्यावर आपला भर राहील असे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2018 4:50 pm

Web Title: kanhaiyya kumar gave reference of dog byte while speaking about narendra modi
Next Stories
1 बायकोची नवऱ्याला मारहाण, फोटो पाहिल्यानंतर कोर्टाने दिली सुरक्षा
2 BLOG : ‘या’ कारणासाठी भारताने यूएईकडून मिळणारे ७०० कोटी रुपये नाकारले
3 आयसिसचा पराभव ही ‘अल्ला’ने घेतलेली परीक्षाच: अबू अल बगदादी
Just Now!
X