News Flash

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी करण जोहरचा जबाब नोंदवला जाणार

मुंबई पोलिसांनी दिली माहिती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा जबाब नोंदवला जाणार आहे असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. आजच दिग्दर्शक महेश भट्ट यांची तासाभरापेक्षा जास्त चौकशी करण्यात आली. आता निर्माता दिग्दर्शक करण जोहरचाही जबाब नोंदवला जाणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरली. मात्र सुशांत सिंह राजपूत हा घराणेशाहीचा आणि सिनेसृष्टीतल्या गटबाजीचा बळी ठरला असा आरोपही झाला.

अभिनेत्री कंगना रणौतने या संदर्भात सर्वात आधी आवाज उठवला आणि सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात करण जोहर आणि महेश भट्ट यांचीही चौकशी करा अशीही मागणी तिने केली. दरम्यान सुशांत सिंह राजपूत हा घराणेशाही आणि सिनेसृष्टीतल्या गटबाजीचा बळी ठरला का? हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणात सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती, अपूर्व मेहता, शानू शर्मा (वायआरएफची कास्टिंग हेड) यांच्यासह तीसपेक्षा जास्त जणांची चौकशी झाली आहे. आजच महेश भट यांचाही जबाब नोंदवला गेला. दिग्दर्शक शेखर कपूर हे मुंबईबाहेर असल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना त्यांचा जबाब इमेलद्वारे पाठवला आहे.

जेव्हा सुशांतसिंह राजपूत हा घराणेशाहीचा बळी ठरला असं सिनेसृष्टीतलेच काही लोक म्हणू लागले तेव्हा सर्वाधिक टीका झाली ती करण जोहरवरच. तसंच काही दिवसांपूर्वीच या प्रकरणी महेश भट्ट आणि करण जोहर यांची चौकशी कधी होणार? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला होता. अखेर आज करण जोहरची चौकशी केली जाणार आहे त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. एएनआयने संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 8:02 pm

Web Title: karan johars statement will be recorded this week in the sushant singh rajput case says mumbai police scj 81
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 “सत्ता पिपासू लोकांमुळे लोकशाही धोक्यात येईल”; राजस्थान सत्ता नाट्यावर अभिनेता संतापला
2 सुशांतला ‘ती’ ऑफर कधी दिलीच नव्हती, महेश भट्ट यांचा मुंबई पोलिसांकडे खुलासा
3 दिलजीत दोसांजच्या या शर्टची किंमत तुम्हाला माहितेय का?
Just Now!
X