08 March 2021

News Flash

मोबाइलवर बोलताना लोकलची धडक 

प्रवाशांनी रेल्वेच्या हद्दीत मोबाइल वापरताना भान बाळगायला हवे.

फलाटावरील प्रवाशाचा मृत्यू

मोबाइलवर बोलताना किंवा गाणी ऐकताना रेल्वेरूळ ओलांडताना अपघातात मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र मंगळवारी लोअर परळ स्थानकात मोबाइलवर बोलत फलाटाच्या टोकाला उभ्या असलेल्या प्रवाशाला लोकलची धडक लागून त्याचा मृत्यू झाला.

बाबूराव पाटील (५५) हे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास लोअर परळ स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर उभे होते. ते मोबाइलवर बोलत फलाटाच्या कडेला उभे असताना दादरच्या दिशेला जाणाऱ्या लोकलची जोरदार धडक पाटील यांना लागली. यात पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, पाटील यांचा मृतदेह गाडीखाली आला आणि त्यांचा देह छिन्नविछिन्न झाला.  लोकलखालून मृतदेह काढणे शक्य नसल्याने गाडी हळूहळू पुढे नेण्यात आली; परंतु त्यामुळे मृतदेहाचे तुकडे रुळावर पसरले. हे दृश्य बघणाऱ्या प्रवाशांच्या जिवाचा थरकाप उडाला.

प्रवाशांनी रेल्वेच्या हद्दीत मोबाइल वापरताना भान बाळगायला हवे.  फलाटावर उभे राहून मोबाइलवर बोलताना गाडीची धडक लागण्याची घटना भीषण आणि दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नयेत, ही जबाबदारी प्रवाशांची आहे.

– दत्तात्रय बंडगर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सेंट्रल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 12:13 am

Web Title: local hit person when he is speaking on mobile
Next Stories
1 मौजमजा करण्यासाठी  मित्रांच्याच दुचाकींची चोरी
2 ‘त्या’ विद्यार्थ्यांची नावे समजली
3 मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली; वीजेअभावी गाड्यांमधील लाईट आणि पंखे बंद
Just Now!
X