आठ स्पर्धकांमध्ये चुरस
‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी रवींद्र नाटय़मंदिर येथे होत आहे. राज्यातील आठ शहरांमधून प्राथमिक व विभागीय अंतिम फेऱ्या जिंकून महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या आठ युवा वक्त्यांची शाब्दिक लढाई अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि ‘राशिचक्र’कार शरद उपाध्ये यांच्या खास उपस्थितीत रंगणार आहे. या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी सवार्र्साठी खुली असून या कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. यातून पहिल्या क्रमांकावर नाव कोरणाऱ्या स्पर्धकाला प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी यांच्या हस्ते ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ हे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिकाने गौरविले जाईल. ‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल प्रोडक्ट्स’ यांचे सहकार्य आणि ‘पॉवर्ड बाय सिंहगड इन्स्टिटय़ूट्स’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’ आणि ‘आयसीडी’ असलेल्या ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’ची महाअंतिम फेरी प्रेक्षकांसाठी खुली आहे. ‘स्टडी सर्कल’ आणि ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ हे या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.

Untitled-36