14 December 2019

News Flash

वक्तृत्वाचा जागर २६ फेब्रुवारीपासून

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’चे प्राथमिक फेरीचे विषय जाहीर

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’चे प्राथमिक फेरीचे विषय जाहीर

राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि मनोरंजनापासून क्रीडा क्षेत्रापर्यंतच्या सर्वच क्षेत्रांत तरुण पिढी समाजमाध्यमांवर व्यक्त होते. त्यांना त्यांची मते विस्तृतपणे व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच तेजस्वी वक्ते घडविण्यासाठी सुरू झालेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेचे नवे पर्व २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पध्रेच्या प्राथमिक फेरीचे विषयही जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्राला लाभलेल्या तेजस्वी वक्त्यांची परंपरा जोपासत ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील तरुण विचारवंतांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे हे पाचवे पर्व आहे.

‘‘मी-टू’ पणाची बोळवण’, ‘क्लोनिंग: माकडानंतर माणूस’, ‘चरित्रपटांचे चारित्र्य’, ‘खेळ की नायक’ हे या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चार विषय आहेत. विषयांचा अभ्यास करण्यासाठी गुगल किंवा आंतरजालातील माहितीचा वापर विद्यार्थ्यांनी करण्यास हरकत नाही; परंतु विषयांची मांडणी करताना केवळ ही माहिती देऊ नये. विषयांचा चौकस, र्सवकष विचार करणे अपेक्षित आहे. सामाजिक जाणिवा जागृत होतील अशा वैविध्यपूर्ण आणि अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विषयाचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे.

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक असलेला कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातील आणि १६ ते २४ या वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ  शकेल. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, रत्नागिरी आणि नागपूर अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे.

ही स्पर्धा तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. आठही विभागांतून निवडण्यात आलेल्या वक्त्यांची महाअंतिम फेरी मुंबईत १७ मार्चला रंगणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क  मुंबई : युसूफ कोलंबोवाला- ९९२०७९३३५५, मणिंदर सिंह – ९९११५८३३७७. नवी मुंबई : समीर म्हात्रे- ९०२१७८३४०८. ठाणे : कमलेश पाटकर – ९८२०६६४६७९, मिलिंद दाभोळकर- ९१६७२२१२४६. पुणे : अमोल गाडगीळ- ९८८१२५६०८२. नाशिक : वंदन चंद्रात्रे- ९४२२२४५०६५, ९२२५११३९८३. नागपूर (शहर) : गजानन बोबडे- ९८२२७२८६०३. रत्नागिरी : हेमंत चोप्रा- ९४२२०५२४७६, ९४२००९५१०४. विदर्भ : शरद भुते- ९०९६०५०७४०. औरंगाबाद : सदाशिव देशपांडे- ९९२२४००९७६. कोल्हापूर : संदीप गिरिगोसावी- ९६५७२५५२७७.

प्रायोजक

‘पितांबरी कंठवटी’ प्रस्तृत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.

First Published on February 18, 2019 12:02 am

Web Title: loksatta oratory competition 2019 2
Just Now!
X