नावनोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाला भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांच्या आग्रहास्तव नावनोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण मोठय़ा जिद्दीने पाय रोवून उभे आहेत. त्यांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते.

गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत १२ तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आला. कला, क्रीडा, आरोग्य, समाजसेवा, संशोधन अशा विविध क्षेत्रांतील युवारत्नांच्या कर्तृत्वाला मिळालेली ती पावती होती. यंदाही या उपक्रमाला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. उपक्रमात सहभागासाठी संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे.

ऑनलाइन नोंदणी अशी..  

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तरुणांनी  http://taruntejankit.loksatta.com/methodology/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जात माहिती भरून गुरुवार, ३१ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर नोंदणी करताना काही अडचणी आल्यास भ्रमणध्वनी क्र. ९३७२२२३९६३ यावर सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपर्क करता येईल. राज्यभरातून आलेल्या अर्जातून नामवंतांची समिती ‘तरुण तेजांकित’साठी तरुणांची निवड करणार आहे. त्यासाठी विभागीय समित्या नेमण्यात आल्या आहेत.

विभागनिहाय समित्या

श्रीरंग इनामदार (क्रीडा), योगेश शौचे (संशोधन), प्रसाद वनारसे (कला), अरविंद पाटकर (साहित्य), विनोद शिरसाठ (सामाजिक/साहित्य); नागपूर : डॉ. सुखदेव थोरात (सामाजिक), डॉ. प्रमोद पडोळे (संशोधन), अ‍ॅड्. स्मिता सिंगलकर (कला), नितीन लोणकर (नवउद्यमी), डॉ. शरद सूर्यवंशी (क्रीडा); नाशिक : अपूर्वा जाखडी (विज्ञान/ संशोधन), मकरंद हिंगणे (संगीत), अभय कुलकर्णी (नवउद्यमी), आनंद खरे (क्रीडा), डॉ. वृंदा भार्गवे (कला/साहित्य), मेधा सायखेडकर (विधि), संदीप डोळस (समाजकारण); औरंगाबाद : मुकुंद कुलकर्णी (उद्योग), विश्वनाथ ओक (संगीत), बी. बी. ठोंबरे, सु. भि. वराडे (कृषी); कोल्हापूर : दिलीप बापट (कला), अनंत माने (उद्योग), प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर (विज्ञान); रत्नागिरी : डॉ. पराग हळदणकर (संशोधन), डॉ. किशोर सुखटणकर (शिक्षण/संशोधन), नितीन कानविंदे (कला), उदय लोध (व्यापार/पर्यटन), मिलिंद दीक्षित (क्रीडा)

सहप्रायोजक.. : ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमाचे सारस्वत बँक सहप्रायोजक असून एम. के. घारे ज्वेलर्स ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत.