युवकांमधील ऊर्जा, उद्यमशीलता, जिद्द, प्रतिभेला गौरवणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असली, तरी राज्यासह जगभरात करोनाच्या थैमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या महिन्यात होणारा तरुण तेजांकित सोहळा स्थगित करण्यात आला आहे. लवकरच या सोहळ्याबाबतचा तपशील जाहीर करण्यात येईल.

या उपक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्याबाहेरूनही चारशेहून अधिक अर्ज आले. गेल्याच आठवडय़ामध्ये ‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०१९’ पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करण्यासाठी मान्यवर परीक्षकांची बैठक मुंबईत झाली. त्यांनी विविध क्षेत्रांत आदर्श निर्माण करणाऱ्या प्रज्ञावंतांची निवड केली. या महिन्यात होणाऱ्या भव्य सोहळ्यात ‘तरुण तेजांकितां’ना गौरविण्यात येणार होते. मात्र करोना विषाणूच्या प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा सोहळा तूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. त्याविषयीची माहिती लवकरच देण्यात येणार आहे.

प्रायोजक : एमआयडीसी प्रस्तुत आणि सारस्वत बँक, रुणवाल समूह तसेच सिडको सहप्रायोजित या सोहळ्याचे पॉवर्ड बाय पार्टनर एम. के. घारे ज्वेलर्स आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असून, एबीपी माझा हे टेलिव्हिजन पार्टनर, तर पीडब्ल्यूसी हे नॉलेज पार्टनर आहेत.