मेल-एक्स्प्रेसने उपनगरीय रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या व बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना आता लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

यापूर्वी टर्मिनसवर उतरून घर गाठण्यासाठी स्थानकाबाहेरील रिक्षा-टॅक्सीचा पर्याय निवडावा लागत असे. तर घर ते टर्मिनसवर जाण्यासाठी लोकलऐवजी अन्य वाहतुकीचा अवलंब करावा लागत होता. यात प्रवाशांची लूटही होत होती. प्रवाशांचा हा त्रास वाचवण्यासाठी पूर्वीचा नियम कायम करत मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना लोकल प्रवासाची मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणे मात्र लोकलचे तिकीट खरेदी करावे लागेल.

मेल-एक्स्प्रेसचे आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच लोकलचे तिकीट मिळणार आहे. प्रवाशांना एकाच दिशेकडील व मार्गावरील (सिंगल तिकीट) तिकीट मिळेल. लांबपल्ल्याची गाडी सुटण्यापूर्वी आणि दाखल झाल्यानंतर सहा तासांपर्यंत लोकलचे तिकीट वैध राहणार आहे.