03 March 2021

News Flash

‘मकरसंक्रांत आणि १४ जानेवारीचा काहीही संबंध नाही’

२२ डिसेंबर रोजी सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासूनच दिवस मोठा होत जातो.

दा. कृ. सोमण यांची माहिती
मकरसंक्रांत ही नेहमी १४ जानेवारी रोजीच येते हा गैरसमज असून मकरसंक्रांत व १४ जानेवारी यांचा तसा काहीही संबंध नाही. या वर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी आली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
२२ डिसेंबर रोजी सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासूनच दिवस मोठा होत जातो. पण आपल्याकडील पंचांगे निरयन पद्धतीवर आधारित असल्याने सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश केला की मकरसंक्रांतीचा सण आपण साजरा करतो. यंदाच्या वर्षी १४ जानेवारी रोजी उत्तररात्री १ वाजून २६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याने रात्री निरयन मकर राशीत प्रवेश केल्यामुळे मकरसंक्रांतीचा पुण्य काळ १५ जानेवारी रोजी आला आहे. दर ४०० वर्षांनी निरयन मकरसंक्रांत तीन दिवसांनी पुढे जाते. दरवर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंदाचा कालावधी साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकरसंक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. सन २०० मध्ये मकरसंक्रांत २२ डिसेंबर रोजी, १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. पुढे १९७२ पर्यंत मकरसंक्रांत १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून १९८५ पर्यंत ती कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारी रोजी येईल, असेही सोमण म्हणाले.
२१०० पासून निरयन मकरसंक्रांत १६ जानेवारी रोजी येईल. अशा प्रकारे मकरसंक्रांतीचा दिवस पुढे पुढे जात सन ३२४६ मध्ये मकरसंक्रांत १ फेब्रुवारी रोजी येणार आहे. मकरसंक्रांत ही अशुभ किंवा वाईट नसते. तोही गैरसमज असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 12:01 am

Web Title: makar sankranti has no relation with january 14
टॅग : Makar Sankranti
Next Stories
1 सहकारसम्राटांवरील बंदीची संक्रांत अटळ
2 राज्यातील ‘यूपीएससी’च्या उमेदवारांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना
3 आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Just Now!
X