लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कारवाई टाळण्यासाठी महिलेने भररस्त्यात वाहतूक पोलीस शिपायाला के लेल्या मारहाणीच्या प्रसंगाची पुनरावृत्ती बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हाजी अली दर्गा परिसरात घडली. ताज्या घटनेत पोलिसांवर हात उचलण्यात आलेला नाही. मात्र, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी अय्याज मांडवीकर या सराईत गुन्हेगारासह त्याच्यासोबत उपस्थित महिलेने अटक किं वा कारवाई टाळण्यासाठी कर्तव्यावरील पोलिसांसोबत हुज्जत घातली, त्यांच्यावर आरोप के ले आणि या प्रसंगाची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरवली.

या माहितीस पोलीस प्रवक्ते एस. चैतन्य यांनी दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हाजी अली दर्गा येथे येणाऱ्या भाविकांसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र दर्गाशेजारील किनाऱ्यावर, पदपथांवर मध्यरात्रीपर्यंत बरीच गर्दी असते. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गस्तीवर असलेल्या ताडदेव पोलिसांना किनाऱ्यावर गर्दी आढळली.

पोलिसांनी उपस्थितांना घरी जाण्याची सूचना के ली. तेव्हा अय्याज आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने पोलिसांशी हुज्जत घातली. अन्य नागरिकांनी काढता पाय घेतला. मात्र अय्याज, अनोळखी महिला मात्र या सूचना मानण्यास तयार नव्हते. तेव्हा पोलीस पथकातील एका अंमलदाराने या दोघांची आणि त्यांच्या वाहनाची छायाचित्रे घेण्यास सुरुवात कली. त्यावरून दोघांनी आणखी वाद घातला.

दारूच्या नशेत कर्तव्य बजावता, महिलेशी असभ्यपणे वागता, असे आरोप दोघांनी सुरू के ले. या प्रसंगात अय्याजसोबतची अनोळखी महिला पोलीस वाहनातील अंमलदारांवर धावून गेली. चालक अंमलदार नवा असल्याने त्याने वाहन मागे घेतले. हा प्रसंग अय्याजने मोबाइलमध्ये चित्रित के ला आणि समाजमाध्यमांवरून पसरवला.

या प्रसंगाची माहिती मिळताच ताडदेव पोलीस ठाण्यातून अतिरिक्त मनुष्यबळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीसाठी पोलीस पथकातील दोन अंमलदारांची चाचणी करून ते मद्याच्या अंमलाखाली होते का, हे चाचपण्यात आले. मात्र दोघांच्या अहवालातून ते मद्याच्या अंमलाखाली नव्हते, असे स्पष्ट झाले आहे.

महिला वाहतूक पोलिसास मारहाण

उपायुक्त चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार अय्याज पोलीस अभिलेखावरील(रेकॉर्डवरील) गुन्हेगार असून त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे. २३ ऑक्टोबरला काळबादेवी परिसरात सागरिका तिवारी या महिलेने वाहतूक पोलीस हवालदार एकनाथ पारठे यांना भररस्त्यात मारहाण के ली होती. विना शिरस्त्राण (हेल्मेट) दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सागरिका आणि तिच्या साथीदाराला पारठे यांनी कारवाईसाठी थांबवले होते.