News Flash

मेधा गाडगीळ, श्रीवास्तव अतिरिक्त मुख्य सचिवपदी

भारतीय प्रशासन सेवेच्या १९८३च्या तुकडीतील मेधा गाडगीळ आणि सुधीर श्रीवास्तव या दोन सनदी अधिकाऱ्यांना राज्य शासनाने अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे

| December 7, 2013 02:10 am

भारतीय प्रशासन सेवेच्या १९८३च्या तुकडीतील मेधा गाडगीळ आणि सुधीर श्रीवास्तव या दोन सनदी अधिकाऱ्यांना राज्य शासनाने अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे. दोन अतिरिक्त मुख्य सचिवपदाची दोन पदे रिक्त झाल्याने दोघांना बढत्या देण्यात आल्या आहेत. गाडगीळ सध्या गृह विभागात प्रधान सचिव (अपिल) या पदावर कार्यरत आहेत. हिवाळी अधिवेशन संपल्यावरच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याने गाडगीळ यांच्याप्रमाणेच सुधीर श्रीवास्तव यांच्याकडे ते सध्या कार्यरत असलेल्या वित्त विभागाचा कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:10 am

Web Title: medha gadgil srivastava on additional chief secretary post
Next Stories
1 नाकाबंदी परीक्षेत काही उत्तीर्ण, काही अनुत्तीर्ण
2 सराफाच्या दुकानात लूट
3 ‘माध्यान्ह भोजना’च्या रकमेत ७.५ टक्के वाढ
Just Now!
X