04 July 2020

News Flash

तिन्ही रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी, १२ मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर दिवसा तर पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण

| May 11, 2013 02:50 am

उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी, १२ मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर दिवसा तर पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण आणि ठाणे दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी चार असा पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
यामुळे ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे आणि डोंबिवली स्थानकावरून उलट दिशेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जलद मार्गावरील दोनही दिशेकडे उपनगरी गाडय़ांना त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
हार्बर मार्गावर वांद्रे ते वडाळा रोड दरम्यान दोन्ही दिशेने तर सीएसटी ते कुर्ला दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० दरम्यान मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे वांद्रे ते सीएसटी दरम्यानची वाहतूक पूर्ण बंद राहणार असून सीएसटी ते कुर्ला दरम्यान मेन लाइनने गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
या गाडय़ा चिंचपोकळी आणि करीरोड या स्थानकांवर थांबणार नाहीत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात आला नसून रविवारी मध्यरात्री १२.५० ते पहाटे ४.५० या काळात बोरिवली ते भाइंदर दरम्यान धीम्या मार्गावर दोन्ही दिशेने ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सर्व उपनगरी गाडय़ा बोरिवली ते विरार दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2013 2:50 am

Web Title: mega block on all local train routes
Next Stories
1 पत्नीवर चाकूने हल्ला करून विक्रीकर उपायुक्त फरारी
2 ठाणे स्थायी समिती बैठकीवरील स्थगिती उठविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
3 एसटी स्थानकांवर आता ‘हिरकणी कक्ष’
Just Now!
X