04 July 2020

News Flash

तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी रविवार, २६ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे (अप-जलद)मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी

| May 26, 2013 02:12 am

रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी रविवार, २६ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे (अप-जलद)मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत हा ब्लॉक असेल. या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद लोकल ठाण्यापर्यंत अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. ठाण्यापासून पुढे परत या लोकल अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान तर अप आणि डाऊन मार्गावर वडाळा ते वांद्रे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. अंधेरी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यानची लोकल खंडीत करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर स. १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ या रेल्वेस्थानकादरम्यान मेगाब्लॉक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2013 2:12 am

Web Title: mega block on all three routes
टॅग Mega Block,Railway
Next Stories
1 ठाण्यात एकाच इमारतीत चार घरफोडय़ा
2 बेस्ट बसला ट्रकची धडक, ७ जखमी
3 आयपीएल फिक्सिंग प्रकरण: गुरूनाथ मयप्पन यांना २९ मे पर्यंत पोलिस कोठडी
Just Now!
X