मुंबई : रूळ, ओव्हरहेड वायर यांसह अन्य काही तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर व पश्चिम रेल्वेवर १९ ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप धिमा मार्ग, हार्बरवर कुर्ला ते वाशी अप डाऊन मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे लोकल गाडय़ा उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

कुठे: कल्याण ते ठाणे अप धिमा मार्ग

कधी: रविवार, १९ ऑगस्ट. स. ११.२० ते सायं. ४.२० वा.

परिणाम: कल्याणहून सुटणाऱ्या धिम्या व अर्धजलद लोकल गाडय़ा मुलुंडपर्यंत अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे: कुर्ला ते वाशी अप डाऊन मार्ग

कधी: रविवार, १९ ऑगस्ट. स. ११.१० ते सायं. ४.१० वा.

परिणाम: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल,  वाशीदरम्यानच्या अप व डाऊन लोकल फेऱ्या ब्लॉकवेळी रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे

कुठे: बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप व डाऊन जलद मार्ग

कधी: रविवार, १९ ऑगस्ट. दु. १०.३५ ते दु. २.३५ वा.

परिणाम: बोरिवली ते अंधेरीदरम्यान जलद मार्गावरील लोकल गाडय़ा धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.