मिरा भाईंदर महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि गटनेते  यांचे काल करोनामुळे निधन झाले. दुर्देवी बाब म्हणजे त्या पाठोपाठ आज त्यांच्या आईचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा पाठोपाठ मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान,  नगरसेवकासह त्यांची पत्नी, आई आणि भावाला करोनाची लागण झालेली होती. यातून त्यांची पत्नी करोनामुक्त होऊन घरी परतली होती. दरम्यान काल (मंगळवार)  उपचारादरम्यान नगरसेवकाचा मृत्यू झाला.  कुटुंबावर एवढा मोठा आघात झालेला असतानाच दुसऱ्याच दिवशी नगरसेवकाच्या आईचाही मृत्यू झाल्याने नगरसेवक कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. शिवाय, एकाच कुटुंबातील दोघांचा लागोपाठ मृत्यू झाल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्ये चिंतायुक्त भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी वाचा- चिंताजनक, जून महिन्यात मुंबईत दरदिवशी करोनामुळे सरासरी ५३ मृत्यू

५५ वर्षीय नगरसेवकावर दोन आठवड्यांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांना करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.