News Flash

वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना – राज ठाकरे

मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली असून अनेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे

मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली असून अनेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. मनसेचा १४ वा वर्धापन दिन सोहळा आज पार पडला असून यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील नेत्यांची नावं जाहीर केली. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णुदास भावे नाटयगृहात मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शॅडो कॅबिनेटसंबंधी बोलताना राज ठाकरे यांनी वाभाडेकाढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आल्याचं सांगितलं.

राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेटसंबंधी बोलताना सांगितलं की, “महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. कोणालाही आपण मंत्री झालो आहोत असं वाटू नये यासाठी इतक्या जणांना कॅबिनेटमध्ये घेतलं आहे. वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे. पण नुसतेच वाभाडे काढू नका. सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा”.

शॅडो कॅबिनेटमध्ये कोणलाा संधी ?

विधी न्याय – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजीव उंबरकर, राहुल बापट, प्रवीण कदम, योगेश खैरे, प्रसाद सरफरे, डॉक्टर अनिल गजणे
जलसंपदा – अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
महसूल आणि परिवहन – अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, अजय बहाले, श्रीधर जगताप
ऊर्जा – मंदार हळदे, विनय भोईटे
ग्रामविकास – जयप्रकास बाविस्कर, अमित ठाकरे, परेश चौधरी, प्रकाश भोईर, अनिल शिदोरे
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन – संजय चित्रे, अमित ठाकरे, वाघिश सारस्वत, संतोष धुरी, आदित्य दामले
शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर (विशेष उच्च शिक्षण), सुधाकर, बिपीन नाईक, अमोल रोगे, चेतन पेडणेकर
कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे
नगरविकास आणि पर्यटन – संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर, किर्ती कुमार शिंदे, हेमंत कदम, संदीप कुलकर्णी
सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण – रिटा गुप्ता
सहकार आणि पणन – दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये, जयदेव कर्वे, वल्लभ चितळे
अन्य व नागरी पुरवठा – राजा चौघुले, वैभव माळी, महेश जाधव, विशाल पिंगळे
मत्स्यविभाग – परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड
महिला आणि बालविकास – शालिनी ठाकरे
रोजगार हमी आणि फलोत्पादन – बाळा शेंडगे, आशिष पुरी
सार्वजनिक बांधकाम – सामाताई शिवलकर, संजय शिरोडकर
सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार – अमेय खोपकर
कृषी आणि दुग्धविकास – अमर कदम, संजीव पाखरे
सामाजिक न्याय – संतोष सावंत
कौशल्य विकास – स्नेहल जाधव
भटक्या विमुक्त जाती – गजानन काळे
ग्राहक संरक्षण – प्रमोद पाटील
आदिवासी विकास – आनंद एमबडवाड, किशोर जाचक, परेश चौधरी
पर्यावरण – रुपाली पाटिल, किर्तीकुमार शिॅदे, देवव्रत पाचिल
खारजमीन भुकंप पुनर्वसन – अमिता माझगावकर,
क्रिडा – विठ्ठल लोकणकर
अल्पसंख्याक विकास – अल्ताफ खान, जावेद तडवी
मराठी भाषा आणि तंत्रज्ञान – केतल जोशी

आणखी वाचा- राज ठाकरेंना या एका गोष्टीचा आनंद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात पार पडलेल्या अधिवेशनात शॅडो कॅबिनेटची स्थापना करणार असल्याचं जाहीर केलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन असं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 1:29 pm

Web Title: mns foundation day anniversary raj thackeray navi mumbai sgy 87
Next Stories
1 “सरकारला शंभर दिवस पूर्ण होऊनही…”; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली अजित पवरांसंदर्भातील खंत
2 पवार साहेब, या विद्यार्थ्यांचा जीव वाचवा; व्हिडीओ पोस्ट करून केली विनंती
3 मनसेचं संभाव्य शॅडो कॅबिनेट, नांदगावकरांकडे गृह तर सरदेसाईंकडे अर्थ; अमित ठाकरेंवर कोणती जबाबदारी ?
Just Now!
X