मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1. प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री

गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. वाचा सविस्तर..

2.कोहिनूरचे उन्मेष जोशी यांच्या दोन मालमत्ता जप्त

तीन सरकारी बँकांचे ६८ कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवल्याने लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेनानेते मनोहर जोशी यांचे विकासक असलेले चिरंजीव उन्मेष जोशींसह त्यांच्या कुटुंबियांची कुर्ला आणि लोणावळ्याची मालमत्ता जप्त केली आहे. वाचा सविस्तर..

3.CSMT Fob Collapse: स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई अटकेत

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर..

4. PNB घोटाळा: नीरव मोदी विरोधात लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला मुख्य आरोपी नीरव मोदीविरोधात कारवाईचा फास आवळला गेला आहे. वाचा सविस्तर..

5. किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत?

ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याबरोबरच आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केल्याने सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. वाचा सविस्तर..