News Flash

चेंबूरमधील आर. के. स्टुडिओत भीषण आग

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

इलेक्ट्रीक स्पार्कमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मुंबईतील ख्यातनाम आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. डान्स रिएलिटी शोच्या सेटवर ही आग लागल्याचे समजते. अग्निशमन दलाचे ६ बंब आणि पाच टँकर्सनी दोन तासांच्या अथक मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

चेंबूरमधील आर के स्टुडिओमध्ये शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. इलेक्ट्रीक स्पार्कमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. आगीत स्टुडिओतील काही भाग जळून खाक झाला. सेटसाठी लागणारे प्लायवूड  या भागात असल्याने आग झपाट्याने पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत. शनिवारी शुटिंग नसल्याने स्टुडिओत फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे जीवितहानी टळली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आर के स्टुडिओलगतच्या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. आर के स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांचे शुटिंग झाले आहे. आगीच्या वृत्तावर आर. के. स्टुडिओ व्यवस्थापनाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दोन तासांनंतर आग विझवण्यात यश आले असून आगीत स्टुडिओचे मोठे नुकसान झाल्याते समजते. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Next Stories
1 भुयारी गटारद्वार उघडण्यामागे स्थानिक कार्यकर्ते
2 ‘म्हाडा’ची घरे न परवडणारी
3 स्वस्त धान्य दुकानांतून आता गरीबांना साखर बंद
Just Now!
X