News Flash

करोनाशी लढणाऱ्या मुंबईकराच्या जीवाशी सुरू होता खेळ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

करोनावर बोगस औषधी तयार केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशात जाऊन कारवाई केली.

करोनावर बोगस औषधी तयार केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशात जाऊन कारवाई केली. (प्रातिनिधिक छायाचित्र)

महाराष्ट्रासह देशात करोनानं थैमान घातलं आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे करोनाच्या आडून पैसे कमावण्यासाठी जीवघेणे कामं होताना दिसत आहे. असाच एक भयंकर प्रकार मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशात कारवाई करत करोनावर बोगस औषधी बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या.

गेल्या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० मे रोजी महाराष्ट्र अन्न आणि औषधी प्रशासन अर्थात एफडीएने करोनावर बोगस औषधी तयार केली जात असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मॅक्स रिलीफ हेल्थकेअर बोगस गोळ्यांचं उत्पादन करत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. मुंबईतील तीन औषधी वितरकांवर (ड्रग्ज डिलर) छापे टाकल्यानंतर ही माहिती हाती आली होती.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. मॅक्स रिलीफ हेल्थकेअर अशी औषध निर्माता कंपनी अस्तित्वात नसल्याचं तपासातून समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी मालक सुदीप मुखर्जी याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास करत असताना मिश्रा नावाची व्यक्ती एका खासगी प्रयोगशाळेत बोगस गोळ्या बनवत असल्याचं समोर आलं. मिश्रा करोनावरील औषधी तयार करून मुखर्जीकडे पाठवायचा. मुखर्जी ही औषधी इतरांना विकायचा, अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी दिली.

आणखी वाचा- मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेल बंद : १९३ कर्मचाऱ्यांचे गंभीर आरोप; न्यायालयाने दिला मोठा दिलासा

नोएडा आणि मेरठमधील कंपन्यांचाही सहभाग

करोना प्रतिबंधक बोगस औषधी उत्पादन आणि विक्री प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांनी जवळपास २२ लाख किंमतीची ओषधी मुंबईत विकली. होलसेल पुरवठा करणाऱ्या कंपनीवर पोलिसांनी छापा टाकला आणि औषधी जप्त केली. नोएडा आणि मेरठमधील कंपन्यांचाही यात सहभाग असून, प्रकरणाचा तपास सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 1:05 pm

Web Title: mumbai police fake covid drugs manufacturing drugs maharashtra food and drugs administration bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना टोला
2 पगार देण्यासाठी पैसेच नसल्याचं सांगत मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलने कारभार गुंडाळला
3 मोदी-उद्धव ठाकरे भेट : सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘वर्षा’वर सुरु होती पवारांसोबत चर्चा
Just Now!
X