मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

“साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल.”, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी पत्रकार परिषदेत दिली.

case of murder, death of a policeman,
पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल, तपासासाठी १० ते १२ पथके
policeman dies after injection given by thieves mumbai
मुंबई : मोबाइल चोरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे पोलिसाचा मृत्यू
24-year-old young man died due to heart attack while practicing for police recruitment
धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई

“१० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉचमन याने कंट्रोल रुमला फोन करून कळवलं की, इथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. त्यावेळी पोलिसांनी जागेवर निर्णय घेऊन त्या महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी हवालदाराने वॉचमनकडून घेऊन पोलिसांनी टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले. चौकीदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे”, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. “साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे.”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. “हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल.”, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.