25 October 2020

News Flash

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम

सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस ही याच कालावधीत पुण्यापर्यंत धावेल व पुण्यातूनच सुटणार आहे.

 

मंकी हिल ते कर्जत घाट क्षेत्रात दुरुस्तीचे काम

मुंबई : मुंबई ते पुणे मार्गावरील मंकीहिल ते कर्जत घाट क्षेत्रात तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

२० जानेवारीपर्यंत ही कामे सुरू राहतील. भुसावळ ते पुणे ते भुसावळ एक्स्प्रेस १६ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत मनमाड, दौंड मार्गे धावेल. तर सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस ही याच कालावधीत पुण्यापर्यंत धावेल व पुण्यातूनच सुटणार आहे.

रद्द गाडय़ा

  •  पुणे ते पनवेल ते पुणे पॅसेंजर  १६ ते २० जानेवारीपर्यंत
  • ट्रेन ५१०२७ सीएसएमटी ते पंढरपूर पॅसेंजर १६ ते १८ जानेवारी
  •  ट्रेन ५१०२८ पंढरपूर ते सीएसएमटी पॅसेंजर १७ ते १९ जानेवारी
  • ट्रेन ५१०२९ व ५१०३० सीएसएमटी ते बिजापूर ते सीएसएमटी पॅसेंजर १५, १६ आणि २० जानेवारी
  •  ट्रेन ५१०३३ आणि ५१०३४ दौंड ते साईनगर शिर्डी ते दौंड पॅसेंजर १५ ते २० जानेवारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 2:01 am

Web Title: mumbai pune railway road change time table akp 94
Next Stories
1 फ्लॅटधारकाची सुरक्षा रक्षकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
2 माणुसकी गोठली! पुण्यात गारठवणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक
3 पुढील सहा दिवस पुण्याच्या गारठ्यात चढ-उतार
Just Now!
X