विविध कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे मुख्य मार्ग व हार्बरवरही मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिमा मार्ग आणि हार्बरवर पनवेल ते वाशी अप-डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे

  • कुठे: मुलुंड ते माटुंगा अप धिमा मार्ग.
  • कधी: रविवार, १६ सप्टेंबर. स. ११.१० ते दु. ४.१० वा.
  • परिणाम: ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या लोकल गाडय़ा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर या लोकल माटुंगा स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे पुन्हा धिम्या मार्गावरून धावतील.अप जलद मार्गावरील जलद तसेच अर्धजलद लोकल या स. ११.०४ ते दु. ३.०६ वा. या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला, तर डाऊन जलद मार्गावरील जलद तसेच अर्धजलद लोकल या स. १०.१६ ते दु. २.५४ वा. या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांत थांबतील. मेगा ब्लॉकदरम्यान सगळ्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग

  • कुठे: पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्ग.
  • कधी: रविवार, १६ सप्टेंबर. स. ११.३० ते दु. ४.३० वा.
  • परिणाम: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेलापूर, पनवेलदरम्यान अप व डाऊन मार्गावरील लोकल गाडय़ा रद्द करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी आणि वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान विशेष लोकल धावतील. पनवेल ते अंधेरी तसेच पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बरवर मार्गावरील गाडय़ाही या काळात रद्द करण्यात येतील.