पोलीस आणि रेल्वेतील कारवाईला वेग  

मुंबई : मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमी    वर पालिकेने मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू के ली आहे. पालिका आयुक्तांनी दररोज २५ हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मंगळवारी दिवसभरात सुमारे २२ हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले असून रेल्वेतही कारवाईने वेग घेतला आहे. या पोलीस, रेल्वे आणि मुंबईभर के लेल्या कारवाईतून ४५ लाख ९५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुखपट्टीचा वापर बंधनकारक के ला आहे. मात्र रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर अनेक नागरिकांनी मुखपट्टीचा वापर बंद के ला होता. तसेच कारवाईतही शिथिलता आली होती. त्यामुळे आता पुन्हा मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिके ने क्लिन अप मार्शलची संख्या दुप्पट केली आहे. तसेच दररोज २५ हजार जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गेल्याच आठवड्यात तसे आदेश दिले आहेत. मुंबईत सध्या कार्यरत असलेल्या २,४०० मार्शल्सची संख्या दुपटीने वाढवून ती ४,८०० करण्यात आली आहे.

तसेच मुंबईतील पश्चिाम, मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे सेवांच्या गाड्यांमध्ये मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक रेल्वे मार्गावर  १०० या रीतीने एकूण ३०० मार्शल नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांना २४ तास कोणत्याही गाडीतून फिरून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्यात आले असून पोलीसही मार्शल म्हणून नागरिकांवर दंडात्मक कारवाई करू शकणार आहे.

पर्यटकांना दंड आणि भेट

मुंबई : करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मुखपट्टीविना फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दंड वसूल केल्यानंतर नागरिक मुखपट्टीविनाच निघून जातात. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर मुखपट्टीविना येणाऱ्या पर्यटकांकडून दंड वसूल केल्यानंतर त्यांना एक मुखपट्टी भेट देण्याचा निर्णय पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने घेतला आहे. गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने पर्यटक फिरावयास येत असतात. काही पर्यटक मुखपट्टीविनाच चौपाटीवर दाखल होतात. अशा पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

नगरसेविकेला दंड

मुखपट्टीविना फिरणाऱ्या कांदिवलीमधील प्रभाग क्रमांक २७ मधील नगरसेविका सुरेखा पाटील यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. कांदिवली पूर्वेकडील लोखंडवाला परिसरात सुरेखा पाटील मुखपट्टीविना फिरत असल्याने त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करत दोनशे रुपये दंड वसूल केला. नगरसेविका पाटील यांना दंड आकारल्यानंतर दंडाची पावती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आणि हे प्रकरण उघडकीस आले.

  •  क्लिन अप मार्शलची रस्त्यावरील कारवाई : १४,६०६ नागरिक दंडवसुली : २९ लाख २१ हजार २०० रुपये
  •  पोलिसांनी के लेली कारवाई : ७९११ नागरिक दंडवसुली : १५ लाख ८२ हजार २०० रुपये
  • तीनही रेल्वेमार्गांवर के लेली कारवाई : ४५९ नागरिक दंडवसुली : ९१ हजार ८०० रुपये
  • एकू ण कारवाई : २२,९७९ नागरिक एकूण दंडवसुली : ४५ लाख ९५ हजार २०० रुपये