रणरणत्या उन्हात आणि प्रचंड वाहतुकीचे व्यवस्थापन करत असताना, शहरातील वाहतूक पोलिसांना सतत वाहनांचे भोंगे ऐकावे लागतात आणि लोकांच्या सुरक्षेसाठी व सुरळीत वाहतुकीसाठी घाम पुसत काम करावे लागते. शहरातील वाहतूक पोलिसांना ‘समर में सुकून’ देण्यासाठी, ABZORB या लोकप्रिय अँटि-फंगल पावडरने मुंबईतील प्रचंड वाहतुकीच्या परिसरांमध्ये एक अभियान राबवले व त्यामध्ये शहरातील अनेक वाहतूक पोलिसांना सहभागी करून घेतले.

या अभियानात, प्रामुख्याने उन्हाळ्यात पाऱ्याने उच्चांक गाठला असताना व वातावरणातील आर्द्रता वाढली असताना, वाहतूक पोलिसांना होणाऱ्या उष्म्याच्या व घामाच्या समस्येवर उपाय करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्याने वाहतूक विक्रमी वाढली आहे.

या विशेष उपक्रमात, सम फार्माच्या कन्झ्युमर हेल्थकेअर विभागाच्या ABZORB या उत्पादनाच्या कँटर व्हॅन महत्त्वाच्या वाहतूक सिग्नल/सर्कलवर उभ्या होत्या. या व्हॅन वाहतूक पोलिसांसाठी विशिष्ट ठिकाणी थांबल्या होत्या आणि त्यांनी वाहतूक पोलिसांचे समुपदेशन केले. ओलावा कसा राखायचा, घामाचे व्यवस्थापन कसे करायचे व उन्हाळ्यात सर्रास होणाऱ्या फंगल इन्फेक्शनपासून कसे सुरक्षित राहायचे, याची माहिती देण्यात आली. व्हॅन मुंबईतील विविध ठिकाणी उभ्या केल्या होत्या व त्यातील बहुतेकशी ठिकाणी लक्षणीय वाहतुकीची होती, जशी अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, विले पार्ले जंक्शन, सांताक्रुझ, मालाड, घाटकोपर, जोगेश्वरी पूर्व, कुर्ला.

अंधेरीत कार्यरत असणाऱ्या एका वाहतूक पोलिसाने या उपक्रमाचे स्वागत करत म्हटले, “वाहतूक पोलिसांसाठी हा उपक्रम होत आहे, हे उल्लेखनीय आहे. माझ्या माहितीप्रमाणे, या परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारे उपक्रम राबवला जात आहे. ताण कमी करण्यासाठी आणि उष्मा व घाम कमी करण्यासाठी यामुळे निश्चितच मदत झाली आहे.”