23 November 2020

News Flash

कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड

भारतीच्या घरातून गांजा जप्त

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अमली पदार्थविरोधी पथक कृतीशील ९एनसीबी) झाल्याचं दिसत आहे. शनिवारी ( २१ नोव्हेंबर) सकाळी एनसीबीच्या पथकानं प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. एनसीबीच्या मुंबईतील झोनल पथकाने ही कारवाई केली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणात आतापर्यंत कलाविश्वातील अनेक दिग्गजांची नाव समोर आली आहेत. यात रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल त्याची प्रेयसी गॅब्रीएला यांचीदेखील यापूर्वी एनसीबीने चौकशी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:02 pm

Web Title: narcotics control bureau conducts a raid at the residence of comedian bharti singh in mumbai ssj 93
Next Stories
1 सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा तुर्तास नाहीच; बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती
2 धक्कादायक! मुंबईत दोन अल्पवयीन मुलांनी केला तीन वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार
3 शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक ; महापौरांच्या वक्तव्यावरून भाजपा नेत्याचा टोला
Just Now!
X