News Flash

नवी मुंबई : उघड्यावर लघुशंका करण्यावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या

या प्रकरणातील मुख्य आरोपी २० वर्षांचा आहे

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: पीटीआय)

नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघवी करणाऱ्या चार तरुणांना हटकल्याने एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सचिन पाटील असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव असून ते ३५ वर्षांचे होते. रबाळे एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या गस्तीवरील पोलिसांना शुक्रवारी सचिन हे रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी सचिन यांनी मृत घोषित केलं.

नक्की वाचा >> खाज नडली… चेहरा खाजवण्यासाठी चोराने काही क्षणांसाठी मास्क काढलं अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पाटील यांनी रस्त्याच्या बाजूला उघड्यावर लघुशंका करणाऱ्या एका तरुणाला हटकले. त्यावरुन झालेल्या वादातून हा तरुण आणि त्याच्या इतर तीन मित्रांनी पाटील यांना बेदम मारहाण केली. “आमच्या तपासामध्ये आकाश गायकवाड हा तरुण मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय आकाशला पाटील यांनी यांनी रस्त्याच्याकडेला उघड्यावर लघुशंका करु नकोस असं सांगितलं. साठे नगरमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर आकाश आणि त्याच्या तीन मित्रांनी पाटील यांना बेदम मारहाण करुन रस्त्यावरच जखमी अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन पळ काढला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नक्की वाचा >> चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याला तरुणीने भोसकलं; २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

या प्रकरणातील चारही आरोपी साठे नगरमधून पळून जाण्याच्या तयारी असतानाच पोलिसांनी या चौघांना अटक केली. या चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता त्यांना ५ जानेवारीपर्यंतच पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच २० वर्षीय तरुणाला धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण करुन लुटल्याची घटना घडली होती. सीएसटीहून पनवेलला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सीवूड्स आणि बेलापूर स्थानकादरम्यान हा प्रकार घडला होता. कुर्ला स्थानकामध्ये ट्रेनमध्ये चढलेल्या पाच व्यक्तींनी पैशाची मागणी केली असता पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला या पाच जणांनी मारहणा केलेली. या मुलाला मारहाण केल्यानंतर त्याच्या पाकीटातील साडेतीनशे रुपये, एटीए कार्ड आणि इतर ओळखपत्र या चोरांनी पळवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 8:11 am

Web Title: navi mumbai man killed for objecting to urination in public scsg 91
Next Stories
1 ‘पीओपी’वरील बंदीमुळे मूर्तीकारांपुढे विघ्न
2 सरपंचपदांच्या लिलावांची चौकशी
3 रात्रीची संचारबंदी रद्द?
Just Now!
X