राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. यासंदर्भातले फोटो त्यांनी ट्विट करत करून दाखवलं असं वाक्यही त्यासोबत लिहिलं आहे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतल्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या घरातले फोटो ट्विट करून मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत. तसेच करून दाखवले असं म्हणत शिवसेनेलाही टोला लगावला आहे.

करून दाखवलं असं ट्विट करून नवाब मलिक यांनी घरात आणि घराबाहेर साठलेल्या पाण्याबाबत शिवसेनेला टोला दाखवला आहे. करून दाखवलं हे शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे. एखादं काम केल्यानंतर शिवसेना कायम या प्रकारचे होर्डिंग लावत असते. आता याच वाक्याचा संदर्भ घेत नवाब मलिक यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

मुंबईत पावसाने दाणादाण उडवली आहे, अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. हिंदमाता असेल किंवा दादर टीटीचा परिसर किंवा अंधेरी असेल अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठलं आहे. तसंच पाणी नवाब मलिक यांच्या घरात पाणी आलं आहे. त्यांच्या घराबाहेरही पाणी साठलं आहे. नवाब मलिक यांच्या घराच्या हॉलमध्ये, किचनमध्ये पाणी साठून उपकरणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गुडघाभर साठलेल्या पाण्यात उभं राहून आणि घराची अवस्था नेमकी कशी आणि काय झाली ते दाखवणारे फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केले आहेत.