News Flash

राष्ट्रवादीचे रविवारी पुण्यात शक्तिप्रदर्शन

काँग्रेसची मतदारसंघनिहाय आढाव्यासाठी आज बैठक

काँग्रेसची मतदारसंघनिहाय आढाव्यासाठी आज बैठक

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने २०व्या वर्धापनदिनीचे औचित्य साधून रविवारी पुण्यात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच वेळी काँग्रेस नेत्यांच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचा रविवारी वर्धापन दिन असून, पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन केले होते. त्याची सांगता आणि पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीने सध्या पश्चिम महाराष्ट्र या एकेकाळच्या बालेकिल्ल्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या महिन्यात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली होती. पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा जिंकण्याचे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. त्यातूनच या भागावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी होणाऱ्या मेळाव्याला ५० हजारांपेक्षा जास्त उपस्थिती असेल, असे  सांगण्यात येत आहे.

काँग्रेस अजून सुस्त

राष्ट्रवादीने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असतानाच काँग्रेसच्या पातळीवर अजून शांतताच आहे. उद्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील काही निवडक नेत्यांची बैठक बोलाविली असून त्यात राष्ट्रवादीबरोबरील आघाडी आणि मतदारसंघनिहाय आढावा यावर चर्चा करण्यात येईल. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करताना कोणते मतदारसंघ मित्र पक्षाला सोडता येतील किंवा आघाडीच्या बोलणीत कोणती भूमिका घ्यायची यावर चर्चा करण्यात येईल. राष्ट्रवादीने राज्यात ठिकठिकाणी सभा, बैठकांचा जोर लावला आहे. या तुलनेत काँग्रेसने अजून जोर लावलेला नाही. राष्ट्रवादीत स्वत: शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी विविध नेत्यांचे दौरे सुरू आहेत. काँग्रेसमध्ये अजून शांतता आहे.

राहुल गांधी मंगळवारी भिवंडीत

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून भिवंडी न्यायालयात गुदारण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणीकरिता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मंगळवारी भिवंडी न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.
  • भिवंडी न्यायालयात हजेरी लावल्यावर राहुल गांधी हे गोरेगाव येथे मुंबई काँग्रेसच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:37 am

Web Title: ncp in pune 2
Next Stories
1 धक्कादायक ! १२ वर्षाच्या मुलाचा अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न
2 औद्योगिक देश शिखर परिषद जी-७ रशियाचा पुन्हा समावेश हवा
3 ‘..तरच किम यांना व्हाइट हाऊसचे निमंत्रण’
Just Now!
X