राष्ट्रवादीचे मुरबाडचे आमदार किसन कथोर अडचणीत आले आहेत. २००४ साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना उल्हासनगर निवडणूक आयोगाला त्यांनी खोटी माहिती दिली होती. त्यामुळे त्यांची कारकीर्द धोक्यात आली आहे. कथोरे निवडून आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत यांनी खोट्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात याचिका दाखल केली होती. २००७ साली याचा निकाल कथोरेंच्या विरोधात गेला. या निकालाला आव्हान देणारी याचिका कथोरेंनी दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाला पुढच्या कारवाईचे आदेश दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरेंची आमदारकी धोक्यात?
२००४ साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना उल्हासनगर निवडणूक आयोगाला त्यांनी खोटी माहिती दिली होती.

First published on: 10-05-2014 at 06:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla kisan kathores mlaship in trouble