शिवसेनेत जाण्यासाठी आपण आटापिटा केल्याचे वृत्त स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी फेटाळले आहे. एका वृत्तपत्राने नितेश राणे हे शिवसेनेत जाण्यास इच्छुक असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला असल्याचे वृत्त दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेना पक्ष प्रवेशाच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. तसेच कोण कोणाचा पाठलाग करत होता हे ठरवा, नाहीतर एक दिवस आम्हाला वस्त्रहरण करावे लागेल, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला Shivsena लगावला.

एका वृत्तपत्राने नितेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे वृत्त दिले आहे. परंतु, उद्धव ठाकरे त्यांना पक्षात घेण्यास राजी नसल्याचे त्या वृत्तपत्राने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी शुक्रवारी (दि.५) ट्विट करून हे वृत्त फेटाळले आहे. मी सेनेत जाणार की नाही याची माहिती वांद्र्याच्या साहेबांना किंवा त्यांच्या पीएंना त्यांनी का विचारली नाही, असा प्रतिसवाल उपस्थित केला. तसेच कोण कोणाचा पाठलाग करत होते. नाहीतर एक दिवस आम्हालाच वस्त्रहरण करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राणे कुटुंबिय काँग्रेसवर नाराज असल्याचे वृत्त सातत्याने माध्यमांत येत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. नारायण राणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट न करत सातत्याने काँग्रेस नेतृत्त्वावरच टीका केली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यावेळीही त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. नितेश राणेही सातत्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका करताना दिसतात. त्यामुळे राणे कुटुंबीय काँग्रेसचा लवकरच त्याग करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा असते.

दरम्यान, भाजप अध्यक्ष शहा यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमावेत जातानचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याने काँग्रेसमध्ये राणे यांचे महत्त्व साहजिकच कमी झाले आहे. काही दिवसांपूर्वी राणे यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राणे यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांना राहुल यांची भेट मिळाली होती. त्यानंतर आठवडाभरातच राणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शहा यांच्या भेटीला गेल्याने राणे हे पक्षात राहणार नाहीत याची खूणगाठ काँग्रेस नेत्यांनी पक्की बांधली आहे.