दादर, माहिम आणि धारावीत गेल्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाही. मात्र करोनाचे ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे धारावीतल्या करोनाग्रस्तांची संख्या ११९८ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. करोनामुळे २४ तासात एकही मृत्यू झाला नाही ही बाब समाधानाचीच आहे. मात्र ५३ रुग्ण वाढल्याने एकट्या धारावीत करोनाग्रस्तांची संख्या ११९८ झाली आहे.

मुंबईत करोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मात्र सर्वतोपरी उपाय योजना योजल्या जात आहेत. तसंच चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. अशात आता धारावीत गेल्या २४ तासांमध्ये एकही मृत्यू न होणं ही बाब समाधानाची समजली जाते आहे. तर आता एकट्या धारावीतली रुग्णसंख्या ही ११९८ इतकी झाली आहे.